महाराष्ट्रातील सहकारी चळवळ देशात अग्रेसर आहे, सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहेत.संस्थेची स्थापना १९२७ साली अहमदनगर येथे झाली. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील प्रत्येक सदस्याने काम केले, त्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे.अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि.अहमदनगर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य सोसायटी म्हणुन ओळखली जाते. नेहमी आमच्या प्रिय आणि प्रतिष्ठीत सदस्यांना अचूक सेवा देण्या साठी तत्पर आहोत. आपल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्हे नेहमी आपल्या सेवेत हजार आहोत. तरी आम्ही आपणास विनंती करतो कि आमच्या वर आपला विश्वास दाखवून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी. आम्ही वचनबद्ध आहोत कि, आम्ही आपणांस सर्वोत्तम सेवा देण्याची आमच्या पातळीवर पूर्ण प्रयत्न करू तरी आपल्या सेवेची आम्हाला संधी द्यावी. तुमचे भविष्य यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व सहकारी आपल्या प्रेमळ सहकार्याची साथ बघत आहोत.
कार्यक्षेत्र
संस्थेचे कार्यक्षेत्र हे अहमदनगर जिल्हा असून जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यापुरते मर्यादित आहे.
ISO 9001:2015
अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि हि ISO मानांकन प्राप्त सोसायटी आहे.
उद्देश
सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे.
येथे ठेवलेला पैसा वाढतच जातो.

चेअरमन श्री.अरुण लहानू जोर्वेकर व व्हाईस चेअरमन श्री.प्रतापराव गांगर्डे, संचालक मंडळ व कर्मचारी वृंद दिवाळीनिमित्त पूजन करताना
• मयत सभासदाच्या वारसास तातडीची मदत ५००० रुपये अनुदान
• मयत सभासदांनी शेअर्स का. निधी वजा जाता संपूर्ण कर्ज माफी
• सभासादाची अपघात विमा पोलीसी रु.५,००,००० /- (पाच लाख),
अपघातातील मृत्यू झाल्यास रु.५,००,०००/-(पाच लाख),
अपघातामुळे कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास रु.५,००,०००/-,
अपघातामुळे शरीराचे दोन अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास (उदा.हात,पाय,डोळे.)रु.५,००,०००/- ,
अपघातामुळे शरीरीचा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास (उदा.हात,पाय,डोळे.)रु.२ ,००,००० /-
• मयत सभासदाच्या वारसांना सभासद कल्याण निधी मधून रु.२००००० /- आर्थिक मदत .